"दिव्यांग उन्नती अभियान"

(नाविन्यपूर्ण उपक्रम)


दिव्यांग उन्नती अभियानाची उद्दिष्टे
  • जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळावर online उपलब्ध करणे.
  • अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देणे.
  • तपासणी पश्चात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनाद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
  • दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करून देणे. (उदा.३% अपंग निधी, इतर शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, CSR इ.)
  • प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे. (उदा. ३% खर्च योजना, विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, पेन्शन योजना, एसटी / रेल्वे पास, इतर शासकीय लाभ इ.)
  • सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींना 'स्वावलंबन कार्ड' उपलब्ध करून देणे.
दिव्यांग उन्नती अभियानाचा उद्देश
  • या अभियानांतर्गत जिल्यातील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे,
  • दिव्यांगांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे,
  • विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्य विषयक संदर्भ सेवा उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित घटकांसाठी खुप मोठे काम केले आहे. नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत "दिव्यांग उन्नती अभियान" राबविण्याचे निश्चित झाले आहे.